आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावर हास्य उमलले....
बाळदादा: आधुनिक युगातील कर्ण
अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला - "मधुसूदन ! आपल्या थोरल्या भावापेक्षा उदार कोणी नाही हे तुला माहीत आहे, तरीही तू त्या कर्णाची त्याच्यासमोर स्तुती करतोस?
श्रीकृष्ण म्हणाले - "आमचा मेहुणा नक्कीच धर्मराज आहे. पण शेवटी कर्ण कर्णच असतो. हे मी तुम्हाला कधीतरी समजावून सांगेन.
काही दिवसांनंतर एके दिवशी श्रीकृष्ण संन्यासी वेशात अर्जुनाला घेऊन धर्मराज युधिष्ठिराच्या दारात पोहोचले. त्यांनी धर्मराजला सांगितले की, यज्ञ-हवनदी करण्यासाठी आपल्याला एक मण वाळल्या चंदनाची गरज आहे. महाराज युधिष्ठिरांनी ऋषींचे स्वागत केले आणि त्यांना अतिथीगृहात थांबायला सांगितले.
तो पावसाळ्याचा काळ होता त्यामुळे सगळीकडे लाकडे ओली झाली होती. तरीही महाराज युधिष्ठिराने आपल्या नोकरांना नगरात पाठवून लाकडाची काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. सेवक सर्वत्र फिरले पण त्यांना एक मण चंदन मिळाले नाही . ते चंदनाचा एक तुकडा घेवून युधिष्ठिराकडे आले .
तो तुकडा घेवून महाराज युधिष्ठिर ऋषींच्या वेशात असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकडे गेले. धर्मराज म्हणाले - "महात्मांनो! मी तुमच्यासाठी चंदनाच्या एक मण लाकडाची व्यवस्था करू शकत नाही, पण तुम्हाला दुसरे काही हवे असल्यास तुम्ही ते मागू शकता.
यावर ऋषींच्या वेषात उभे असलेले श्रीकृष्ण म्हणाले - चंदन नसेल तर हरकत नाही. आम्ही इतर ठिकाणाहून व्यवस्था करू. शुभेच्छा!"
असे बोलून ते दोघे निघून गेले.
तेथून दोघेही थेट कर्णाच्या दारात पोहोचले. तेथेही त्यानी एक मण चंदनाची मागणी केली . कर्णाने दोन्ही ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले – “आज चंदन मिळणे शक्य नाही. एक-दोन दिवस राहिल्यास व्यवस्था करता येईल.
यावर श्रीकृष्ण भिक्षूच्या वेशात म्हणाले - "नाही! पावसाळ्यातच यज्ञ करावा लागतो, म्हणून आजच पाहिजे . तुम्ही देऊ शकत असाल तर ठीक आहे नाहीतर आम्ही कुठून तरी व्यवस्था करू.
कर्ण म्हणाला – “असे असेल तर ठीक आहे. मी आता करतो लाकडाची व्यवस्था . असे बोलून कर्णाने आपले धनुष्य बाण उचलले आणि आपल्या महालातील दरवाजे, पलंग आणि सर्व चंदन तोडले आणि म्हणाला - "हे घ्या ! तुमची व्यवस्था झाली आहे.
श्रीकृष्ण म्हणाले - "पण तू आमच्या यज्ञासाठी एवढ्या मौल्यवान वस्तू का मोडल्या."
कर्ण म्हणाला - "या गोष्टी मला पुन्हा बनवता येतील. पण तुम्ही पुन्हा माझ्याकडे येणार नाहीस. माझ्या दारात आलेल्या पाहुण्याला मी रिकाम्या हाताने पाठवू शकत नाही.
हे ऐकून भगवान श्रीकृष्ण कर्णाला आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले.
आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले - "हे बघ अर्जुना! महाराज युधिष्ठिराच्या महालातही चंदनाच्या वस्तू होत्या , पण त्यांनी त्या द्यायचा विचार केला नाही. पण कोरडे लाकूड मागितल्यावर कर्णाने आपल्या सर्व मौल्यवान वस्तू तोडून टाकल्या आणि कोणतीही पर्वा न करता त्या दिल्या .
कर्ण स्वभावाने उदार आहे, पण महाराज युधिष्ठिर विचाराने उदार आहेत.
मित्रांनो !
आज कर्णाचा हा उदारपणा सांगण्याचा अट्टाहास एवढ्यासाठीच मी केला की जी गोष्ट मी माझ्या नजरेने पाहिली
आज सकाळी १० वाजता मी माझ्या कामानिमित्ताने मोहिते पाटील यांच्या " शिवरत्न " बंगल्यावर गेलो होतो . तेथे आपल्या दोन जुळ्या मुलींना घेवून एक शेतकरी बाप उभा होता . तितक्यात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा श्री जयसिंह मोहिते पाटील यांची गाडी गाडी तेथे आली . गाडी येताच शेतकरी पुढे झाला व त्याने नमस्कार केला . त्यांच्या दोन मुली कर्नाटक राज्यातील बैलहोंगल येथील SGV आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजमध्ये BAMS च्या प्रथम वर्षाला होत्या . वडीलांनी शेतात काबाडकष्ट करुन आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे जमविले होते व हे पैसे त्यांनी अकलूजच्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये ठेवले होते . सुमित्रा पतसंस्थेने आपल्या उभारीच्या काळात अनेकांचे संसार उभा केले . साध्या भाजीवाल्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांना मदत केली . शिक्षण , आरोग्य , विवाह , घरजागा , जमीन खरेदी आदीसाठी मदतीचा हात पुढे करुन या संस्थेने अनेकांच्या संसाराला आधार दिला . गावात घर नाही , शिवारात शेत नाही , बाजारात पत नाही अशा उपेक्षित समाजाला सुध्दा आर्थिक आधार देवून त्यांची पत निर्माण केली . महाराष्ट्रात एकेकाळी वैभवशाली परंपरा असलेल्या या पतसंस्थेला कोणाची तरी दृष्ट लागली आणि गेल्या दहा बारा वर्षापासून ही संस्था अडचणीत आली . वास्तविक पाहता या संस्थेचे कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी वेळेत कर्जाची परतफेड केली असती तर ही संस्था कधीच अडचणीत आली नसती पण दुर्दैव !
असो जे झाले ते झाले .
पण मित्रांनो !
आज आपली संस्था अडचणीत आहे म्हणून संस्थेत ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांना वाऱ्यावर न सोडता त्यांना आपल्या घरातील रक्कम देणारा अवलिया मी आज पाहिला आणि माझे डोळे भरुन आले .
आदरणीय बाळदादा हे आज सकाळी दहा वाजता सोमवार असल्याने शेतातील मजूरांचा पगार करण्यासाठी निघाले होते . तो शेतकरी आपल्या दोन मुलींना घेवून तेथे उभा असल्याचे पाहून ते त्याच्या जवळ आले . त्याची चौकशी केली . त्याच्या अनेक पिढ्या या मोहिते पाटील घराण्याशी प्रामाणिक राहिल्या आहेत . गेल्या काही महिन्यापूर्वी त्याने आदरणीय बाळदादांची भेट घेवून आपल्या मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगितले होते आणि आज पुन्हा मुलींना घेवून भेटायला आला होता .
आदरणीय बाळदादा गाडीतून उतरले . मुलींची चौकशी केली आणि फीसाठी नक्की किती रकमेची गरज आहे हे विचारले . दोन्ही मुलींनी अत्यंत प्रामाणिकपणे 3 लाख 20 हजार रुपये सांगितले . पुढचा मागचा विचार न करता शेतातील कामगारांच्या पगारासाठी काढलेली रक्कम त्यांनी मुलींकडे सुपूर्द केली . त्यावेळी त्या मुलींच्या व तीच्या वडीलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना माझ मन भरुन आल .
या शेतकऱ्याचे नाव आहे दत्तात्रय जाधव व या जुळ्या मुलींचे नाव वैभवी व वैष्णवी रा . बोंडले ता माळशिरस जि सोलापूर .
मित्रांनो !
लोक धर्म-कर्माबद्दल मोठ-मोठ्या गोष्टी बोलतात, पण जेव्हा धर्म आचरणात येतो तेव्हा बहुतेक लोक मागे पडतात. आजच्या मोठमोठ्या देणगीदारांना दानधर्मातही स्वतःचा स्वार्थ दिसतो. म्हणूनच मित्रांनो! आजच्या मी अनुभवलेल्या व प्रत्यक्ष पाहिलेल्या या कथेतून आपल्याला एकच धडा शिकायला हवा तो म्हणजे धर्म हा आपला स्वभाव बनला पाहिजे, केवळ आपले विचार नाही.
सूर्यकांत भिसे
9822023564
