Monday, March 6, 2023

आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावर हास्य उमलले....  

बाळदादा: आधुनिक युगातील कर्ण

        महाभारतातील एक उदाहरण आहे.  एकदा भगवान श्रीकृष्ण पांडवांशी बोलताना कर्णाच्या दानशूरतेची आणि औदार्याची प्रशंसा करत होते.  कर्णाची स्तुती पुन्हा पुन्हा ऐकून अर्जुन ईर्षेने पेटू लागला.

  अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला - "मधुसूदन !  आपल्या थोरल्या भावापेक्षा उदार कोणी नाही हे तुला माहीत आहे, तरीही तू त्या कर्णाची त्याच्यासमोर स्तुती करतोस?

श्रीकृष्ण म्हणाले - "आमचा मेहुणा नक्कीच धर्मराज आहे.  पण शेवटी कर्ण कर्णच असतो.  हे मी तुम्हाला कधीतरी समजावून सांगेन.

 काही दिवसांनंतर एके दिवशी श्रीकृष्ण संन्यासी वेशात अर्जुनाला घेऊन धर्मराज युधिष्ठिराच्या दारात पोहोचले.  त्यांनी धर्मराजला सांगितले की, यज्ञ-हवनदी करण्यासाठी आपल्याला एक मण वाळल्या  चंदनाची गरज आहे.  महाराज युधिष्ठिरांनी ऋषींचे स्वागत केले आणि त्यांना अतिथीगृहात थांबायला सांगितले.

 तो पावसाळ्याचा काळ होता त्यामुळे सगळीकडे लाकडे ओली झाली होती.  तरीही महाराज युधिष्ठिराने आपल्या नोकरांना नगरात पाठवून लाकडाची काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.  सेवक सर्वत्र फिरले पण त्यांना एक मण चंदन मिळाले नाही . ते चंदनाचा एक तुकडा घेवून युधिष्ठिराकडे आले .  

तो तुकडा घेवून महाराज युधिष्ठिर ऋषींच्या वेशात असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकडे गेले.  धर्मराज म्हणाले - "महात्मांनो!  मी तुमच्यासाठी चंदनाच्या एक मण लाकडाची  व्यवस्था करू शकत नाही, पण तुम्हाला दुसरे काही हवे असल्यास तुम्ही ते मागू शकता.

 यावर ऋषींच्या वेषात उभे असलेले श्रीकृष्ण म्हणाले - चंदन नसेल तर हरकत नाही.  आम्ही इतर ठिकाणाहून व्यवस्था करू.  शुभेच्छा!" 

 असे बोलून ते दोघे निघून गेले.

 तेथून दोघेही थेट कर्णाच्या दारात पोहोचले.  तेथेही त्यानी एक मण  चंदनाची मागणी केली .  कर्णाने दोन्ही ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले – “आज चंदन मिळणे शक्य नाही.  एक-दोन दिवस राहिल्यास व्यवस्था करता येईल.

यावर श्रीकृष्ण भिक्षूच्या वेशात म्हणाले - "नाही!  पावसाळ्यातच यज्ञ करावा लागतो, म्हणून आजच पाहिजे .  तुम्ही देऊ शकत असाल तर ठीक आहे नाहीतर आम्ही कुठून तरी व्यवस्था करू.

 

 कर्ण म्हणाला – “असे असेल तर ठीक आहे.  मी आता करतो लाकडाची व्यवस्था .   असे बोलून कर्णाने आपले धनुष्य बाण उचलले आणि आपल्या महालातील दरवाजे, पलंग आणि सर्व चंदन तोडले आणि म्हणाला - "हे घ्या !  तुमची व्यवस्था झाली आहे.

श्रीकृष्ण म्हणाले - "पण तू आमच्या यज्ञासाठी एवढ्या मौल्यवान वस्तू का मोडल्या."

  कर्ण म्हणाला - "या गोष्टी मला पुन्हा बनवता येतील.  पण तुम्ही पुन्हा माझ्याकडे  येणार नाहीस.  माझ्या दारात आलेल्या पाहुण्याला मी रिकाम्या हाताने पाठवू शकत नाही.

  हे ऐकून भगवान श्रीकृष्ण कर्णाला आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले.

  आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले - "हे बघ अर्जुना!  महाराज युधिष्ठिराच्या महालातही  चंदनाच्या वस्तू होत्या , पण त्यांनी त्या द्यायचा विचार  केला  नाही.  पण कोरडे लाकूड मागितल्यावर कर्णाने आपल्या  सर्व मौल्यवान वस्तू तोडून टाकल्या  आणि कोणतीही पर्वा न करता त्या दिल्या .  

कर्ण स्वभावाने उदार आहे, पण महाराज युधिष्ठिर विचाराने उदार आहेत.

 मित्रांनो ! 

आज कर्णाचा हा उदारपणा सांगण्याचा अट्टाहास एवढ्यासाठीच मी केला की जी गोष्ट मी माझ्या नजरेने पाहिली  

आज सकाळी १० वाजता मी माझ्या कामानिमित्ताने मोहिते पाटील यांच्या "  शिवरत्न " बंगल्यावर गेलो होतो . तेथे आपल्या दोन जुळ्या मुलींना घेवून एक शेतकरी बाप उभा होता . तितक्यात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा श्री जयसिंह मोहिते पाटील यांची गाडी गाडी तेथे आली . गाडी येताच शेतकरी पुढे झाला व त्याने नमस्कार केला . त्यांच्या दोन मुली कर्नाटक राज्यातील बैलहोंगल येथील SGV आयुर्वेदीक मेडिकल कॉलेजमध्ये BAMS च्या प्रथम वर्षाला होत्या . वडीलांनी शेतात काबाडकष्ट करुन आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे जमविले होते व हे पैसे त्यांनी अकलूजच्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये ठेवले होते . सुमित्रा पतसंस्थेने आपल्या उभारीच्या काळात अनेकांचे संसार उभा केले . साध्या भाजीवाल्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांना मदत केली . शिक्षण , आरोग्य , विवाह , घरजागा , जमीन खरेदी आदीसाठी मदतीचा हात पुढे करुन या संस्थेने अनेकांच्या संसाराला आधार दिला . गावात घर नाही , शिवारात शेत नाही , बाजारात पत नाही अशा उपेक्षित समाजाला सुध्दा आर्थिक आधार देवून त्यांची पत निर्माण केली . महाराष्ट्रात एकेकाळी वैभवशाली परंपरा असलेल्या या पतसंस्थेला कोणाची तरी दृष्ट लागली आणि गेल्या दहा बारा वर्षापासून ही संस्था अडचणीत आली . वास्तविक पाहता या संस्थेचे कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी वेळेत कर्जाची परतफेड केली असती तर ही संस्था कधीच अडचणीत आली नसती पण दुर्दैव ! 

असो जे झाले ते झाले . 

पण मित्रांनो !

 आज आपली संस्था अडचणीत आहे म्हणून संस्थेत ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांना वाऱ्यावर न सोडता त्यांना आपल्या घरातील रक्कम देणारा अवलिया मी आज पाहिला आणि माझे डोळे भरुन आले . 

आदरणीय बाळदादा हे आज सकाळी दहा वाजता सोमवार असल्याने शेतातील मजूरांचा पगार करण्यासाठी निघाले होते . तो शेतकरी आपल्या दोन मुलींना घेवून तेथे उभा असल्याचे पाहून ते त्याच्या जवळ आले . त्याची चौकशी केली . त्याच्या अनेक पिढ्या या मोहिते पाटील घराण्याशी प्रामाणिक राहिल्या आहेत . गेल्या काही महिन्यापूर्वी त्याने आदरणीय बाळदादांची भेट घेवून आपल्या मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगितले होते आणि आज पुन्हा मुलींना घेवून भेटायला आला होता . 

आदरणीय बाळदादा गाडीतून उतरले . मुलींची चौकशी केली आणि फीसाठी नक्की किती रकमेची गरज आहे हे विचारले . दोन्ही मुलींनी अत्यंत प्रामाणिकपणे 3 लाख 20 हजार रुपये सांगितले . पुढचा मागचा विचार न करता शेतातील कामगारांच्या पगारासाठी काढलेली रक्कम त्यांनी मुलींकडे सुपूर्द केली . त्यावेळी त्या मुलींच्या व तीच्या वडीलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना माझ मन भरुन आल . 

या शेतकऱ्याचे नाव आहे दत्तात्रय जाधव व या जुळ्या मुलींचे नाव वैभवी व वैष्णवी रा . बोंडले ता माळशिरस जि सोलापूर .

मित्रांनो !

 लोक धर्म-कर्माबद्दल मोठ-मोठ्या गोष्टी बोलतात, पण जेव्हा धर्म आचरणात येतो तेव्हा बहुतेक लोक मागे पडतात.  आजच्या मोठमोठ्या देणगीदारांना दानधर्मातही स्वतःचा स्वार्थ दिसतो.  म्हणूनच मित्रांनो!  आजच्या मी अनुभवलेल्या व प्रत्यक्ष पाहिलेल्या या कथेतून आपल्याला एकच धडा शिकायला हवा तो म्हणजे धर्म हा  आपला स्वभाव बनला पाहिजे, केवळ आपले विचार नाही.

सूर्यकांत भिसे 

9822023564 

 शैक्षणिक विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व- जयसिंह मोहिते पाटील



दिनांक- २५/०२/२०२३

                शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज चे मुख्याध्यापक, राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य मा.श्री. प्रताप पाटील हे संस्थेतील विविध शाखेतून ३३ वर्ष ८ महिने ९ दिवस सेवा करून नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत याप्रित्यर्थ त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी सत्कारमूर्ती पाटील सरांचा सहकुटुंब सत्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज चे मार्गदर्शक संचालक मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, शि. प्र. मंडळ, अकलूज चे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील या मान्यवरांच्या हस्ते व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, युवा नेते मा.चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील, मा.श्री.दिपकराव खराडे, पाटील, माजी जि.प सदस्य मा.श्री.सतीशराव माने देशमुख, महर्षी प्रशालेचे सभापती मा.श्री.अॅड.नितीनराव खराडे-पाटील, संस्थेचे सचिव मा.श्री.अभिजित रणवरे, सहसचिव मा.श्री.हर्षवर्धन खराडे-पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  

प्रास्ताविकात विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.घंटे सर यांनी पाटील सरांचा जीवन  परिचय देऊन त्यांच्या शैक्षणिक सेवेची व कार्याची ओळख करून दिली. पाटील परिवाराचे वतीने मा. बाळदादांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी मनोगतामध्ये कु. प्रेरणा गायकवाड हिने स्वरचित 'सर' ही कविता सादर करून  पाटील सरांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली. शिक्षक मनोगतातून सौ.सुनीता ठोंबरे मॅडम व श्री. राजेंद्र धोत्रे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर मा. जि. प. सदस्य व वेळापूर शाखेचे सभापती सतीशराव माने -देशमुख यांनीही सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पैलूचे कौतुक आपल्या भाषणातून केले. मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी पाटील सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे व मुख्याध्यापक पदावर केलेल्या सेवेचे कौतुक केले तसेच संस्थेसाठी, प्रताप क्रीडा मंडळासाठी दिलेल्या योगदानाचे भरभरून कौतुक केले. 

यानंतर सत्कारमूर्ती पाटील सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये जीवनामध्ये सहकार महर्षीच्या कार्याची  प्रेरणा घेऊनच कार्य केले हे सांगून मोहिते-पाटील परिवाराने, संस्थेने जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पडल्याची पोहोचपावती या स्नेह सत्कारातून मिळाली हे सांगितले. तसेच शैक्षणिक वाटचालीतील विविध प्रसंग व अनुभव याप्रसंगी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी सरांच्या सृजनशील व्यक्तिमत्वाचे कौतुक करून संस्थेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमामधून त्यांना दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याचे सांगून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच निवृत्तीनंतर संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची जबाबदारी समर्थपणे स्वीकारावी हे सांगितले. प्रभावी नेतृत्वाचे कौतुक करताना राजकीय क्षेत्रासाठीही आपले व्यक्तिमत्व अनुकूल असून ' भावी आमदार' असा नामोल्लेख केला.

या कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, प्राचार्य बागडे सर, माजी प्राचार्य आबासाहेब देशमुख, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक,  शिक्षकेत्तर, विद्यार्थी, मित्रमंडळी, पै पाहुणे, हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पोपट पवार, राजकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमांची सांगता सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताने झाली. शेवटी पाटील सरांच्या वतीने सर्वांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

 अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजनगट कुस्ती स्पर्धा-२०२३ 

दिनांक-१८.०२.२०२३ 



अकलूजच्या "त्रिमुर्ती चषक  कुस्ती स्पर्धेत टाकळीचा कालिचरण सोलनकर चषकाचा मानकरी तर उपविजेता वैभव माने ठरला. 


सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज व महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती शंकरनगर -अकलुज यांचे वतीने दि.१७,१८ व १९ फेब्रुवारी या कालावधीत 'शिवतीर्थ आखाडा, यशवंतनगर' येथे सुरु असलेल्या ४४ व्या त्रिमुर्ती चषक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील अंतिम स्पर्धेत टाकळीच्या कालीचरण सोलणकर व कन्हेरच्या वैभव माने या मल्लांमध्ये अत्यंत चुरशीची व रोमहर्षक लढत होऊन अंतिम क्षणी २ गुणाने टाकळीचा कालिचरण सोलणकर हा त्रिमूर्ती चषकाचा मानकरी ठरला. तीन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धेच्या 'त्रिमूर्ती चषकाचे' वितरण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते पाटील, स. म.साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, भाजपाचे जिल्हा संघटक मा. श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, युवानेते मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे बाद पद्धतीने अत्यंत शिस्तीने पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे बारामती, पंढरपूर, फलटण, आटपाडी, म्हसवड, कुर्डुवाडी, खवासपूर, टेभूर्णी, सराटी,  कंदर,जेऊर, माळशिरस, सदाशिवनगर, नातेपुते, खुडूस, वाफेगांव, अकलूज आदी ठिकाणाहून ६५२ पैलवानांनी तर स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या त्रिमूर्ती चषक' या खुल्या गटासाठी ६२ पैलवानांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रकूल स्पर्धेचे विजेते राम सारंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे पार पाडले.


१ डिसेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत स. म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री.  जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व जयंती समितीचे अध्यक्ष मा. श्री. मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील व परदेशातील मल्लांमध्ये त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धेचे व लावणी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी वाढीव भरघोस बक्षीसांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. 

याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, अमर देशमुख, विजयकुमार देशमुख, किसनराव वाघ, नितीन निंबाळकर, विराज निंबाळकर, विठ्ठलराव ताटे देशमुख,सतीश शेंडगे, मल्लसम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, नामदेव ठवरे, ऑल इंडिया चॅम्पियन पै. कमाल जमादार, पै. सिकंदर

शेख, स.म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामभाऊ सावंत, संचालक, स्पर्धा प्रमुख वसंत जाधव, मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, सचिव पोपट भोसले-पाटील, सदस्य, नरेंद्र धुमाळ,अरविंद वाघमोडे, खंडाप्पा कोरे, दादा कोकाटे, उमेश भिंगे व नियोजनातील सर्व समिती प्रमुख व त्यातील सदस्य, सयाजीराजे मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे धावते समलोचन मल्लसम्राट रावसाहेब मगर यांनी केले.

स्पर्धेतील विविध वजन गटातील त्रिमूर्ती चषकाचे प्रथम द्वितीय क्रमांकाचे विजेते 

25 कि.    संग्राम जाधव रुई                        मनोज गोरड, गोरडवाडी 

28 कि.    आदित्य सावंत, इंदापूर                अधिराज चव्हाण, पंढरपूर 

30 कि.    सुजल गोरड, खुडूस                      प्रसाद जाधव, भाळवणी

32 कि.    हर्षवर्धन पवार, खुडूस                   शिवम निंबाळकर, फलटण 

35 कि.    राजवीर मोरे, अकलूज                 पृथ्वीराज चव्हाण, आटपाडी 

40 कि.    प्रणव हिमने, शिरसवाडे                तुषार कडू, म्हसवड

45 कि.    यशराज मोरे, अकलूज                 योगेश गायकवाड, पानिव 

50 कि.    विवेक सातपुते, म्हसवड               प्रज्योत माने, फलटण 

55 कि.    विशाल सुरवसे, खुडूस                  अजय पवार, माळशिरस 

60 कि.    विशाल रूपनवर, म्हसवड            अभिजित मोटे, खुडूस 

65 कि.    विकी कडे, नातेपुते                      रामेश्वर गाडे, खुडूस 

70 कि.    किरण राणे, नातेपुते                    गणेश गाडे, खुडूस

75 कि.    संदेश शिंपकुले, फलटण              पांडुरंग केदार, पंढरपूर 

80 कि.    किरण माने, जेऊर                      गौतम शिंदे, विहाळ 

85 कि.    अविनाश गावडे, सराटी                विश्वशरण सोलणकर, टेंभुर्णी